सौन्दर्यवंती..!
सौन्दर्यवंती..!
सौंदर्यवती माय चालली
ऐटीने तोऱ्यात
ठेवुनी लेकरे
आपल्या होऱ्यात
टीचभर खळगी
पायपीट भरते
मुलांसाठी पहा
हसतमुखाने कष्ट उपसते
आत्मविश्वासाची नजर बेरकी
स्वाभिमानाने जीवन जगविते
काय हवे नको ते सारे
आनंदाने ती बघते
आभाळ छप्पर किंवा
झोपडीचा निवारा डोईवरी
घेऊन कवेत मुलांना
ती सुखे अर्धपोटीही झोपते
स्वप्न उद्याचे भले मोठे
उघड्या डोळ्यांनीही पहाते
वाद्यावरच्या कातडीवरी आवाज काढून
नित्य उद्याचे ती सुरेख भविष्य रेखते
कौतुक या माय माऊलीचे
मला करावेसे वाटते
दोन्ही हाताना काम देऊनी
हात पसरणे ती खुबीने टाळते
श्रमाची भाकरी खाऊ घालून
नित्य नवा इतिहास रचते
जाता जाता सौख्य समाधानाचे
बोध मनी सहजी पेरून जाते....!
