सौंदर्य
सौंदर्य
सौंदर्य ही
निसर्गाने दिलेली देन,
पण ओळखावी आपण
सौंदर्याची जाण,
सौंदर्य नव्हे फक्त दिसण्याचे
सौंदर्य असे कलेचे,
मधुर वाणीचे,
चाणाक्ष बुद्धीचे अन्
सत्कारी विचार सजलेल्या
सुंदर अशा मनाचे,
मिळाले सौंदर्य सर्वाना
हसत खेळत जगण्याचे
जगास प्रेम अर्पण करण्याचे.
