दशा
दशा
1 min
14.2K
रोज आरशात पाहतो
माझं मलाच मी,
दिसते मला डोळ्यात माझ्या
माझी झालेली दशा...
आरसा करून देतो
मला जाणीव,
माझ्या परिस्थितीची...
सांगतो कारणे
मागे राहण्याची,
अन् दाखवतो दिशा
मला पुढे जाण्याची...
आरसा बोलतो मला
मी बोलल्यावर,
माझ्या प्रतिमेला सोडून
फक्त मला पाहिल्यावर....
