साजणी
साजणी
माझी साजणी
माझ्या कल्पनेत वसलेली,
प्रतिमा तिची
माझ्या मनी सजलेली...
तिची हर एक अदा
मी माझ्या शब्दात रेखाटलेली,
प्रेम म्हणजे फक्त ती
प्रेमाची प्रत्येक कविता
तिच्यासाठीच मी रचलेली,
ओढीने तिच्या
या मनी प्रेम खूप दाटत राही,
त्या पहिल्या भेटीची
मी आतुरतेने वाट पाही...
येईल एक दिवस
माझी परी,
माझी साजणी....

