विसर ना व्हावा
विसर ना व्हावा
1 min
14.2K
मॉडर्न पनाच्या नादात
नव्या जुन्या विचारांच्या वादात
संस्कृतीचा विसर ना व्हावा...
सणासुदीचे बदलते
अस्ताव्यस्त रुप पाहता,
वाटे भिती मज की
परंपरा हा शब्द केवळ
नावालाच ना राहावा....
भाषेचा तर केलाय कालवा
शब्दांची ना राहिली किंमत, माणसंही विसरती लोक
पण माणुसकी चा विसर ना व्हावा,
व्यसना नादी लागून सारी
झिजत चालली पिढी,
गुन्हयांनी भरलेल्या जगाचा
आणखी किती अंत पाहावा?
विसर ना व्हावा..
विसर ना व्हावा..
