मोबाईल.
मोबाईल.
हाती आला मोबाईल
जगण्याची बदलली स्टाईल
सगळेच देऊ लागलेत आता
सेल्फी मध्ये स्माइल..
चालत्या बोलत्या माणसांना
मोबाइल मध्ये कैद केलं,
सगळ्यांच हाल हवाल
पिवळ्या तोडांनी सांगणं सुरू केलं.
खऱ्याखुऱ्या साधनांना
सगळ्यांनी परकं केलं,
असं कसं मोबाइलचं वेडं
लोकांनी लावून घेतलं.
