सैर भैर...!
सैर भैर...!
सैर भैर झालोय देवा
दोन चार थेंब पाण्यासाठी
तुला कारे म्हणायचे
आम्ही सांग जगजेठी
नाही कळवळा
नाही आपुलकी
नाही माया
नाही ममता
बघ आता डोळे फाडून
तुझ्याच तापाने
भेगाळलीय माझी
धरणी माय
म्हणते रोज वर पाहून
तू कुठे हाय..?
काही कर त्या सूर्याला आवर
ढगांची चादर त्याच्यावर हंतर
उर बडवतोय आम्ही
आता धउंबये लवकर
तृप्त कर तुझ्या
मनसोक्त मधुर वर्षावाने
फुलून येऊ दे धरणी
आनंदाने हिरवीगार होऊन
बघ तरी एकदा
आम्हाला प्रेमाने कवेत घेऊन
आम्ही तुझीच लेकरे
तुला विसर पडलाय काय?
उठव त्या वरुणाला
बघ त्याला झोप लागलीय काय..?
