STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

3  

Sunita Ghule

Inspirational

सैनिक हो सलाम

सैनिक हो सलाम

1 min
548


खडा पहारा सीमेवरती

मात करत प्रतिकूल निसर्गाला

देशाचे माझ्या रक्षण करता

सलाम सैनिक हो तुमच्या कार्याला।


रात्रभर पहारा कडाक्याच्या थंडीत

म्हणून आम्ही झोपतो निवांत

सैनिकहो,तुमचे स्मरण आम्हा

सणावारास घास गोड नाही लागत।


शहीद जेव्हा तुम्ही होता

तिरंग्यात शव गुंडाळून येते

आक्रोश माता भगिनींचा ऐकून

हृदय आमचे गलबलून येते।


पत्नी,मुले शोधतात तुम्हाला

जेव्हा इतर मुले बाबासोबत खेळतात

खरच तेव्हा मन भरून येते,

कुठेय माझा बाबा आईला विचारतात।


शतशः नमन तुमच्या देशभक्तीला

सलाम सैनिक हो तुमच्या कार्याला

देशभक्तिने सळसळणारे रक्त

तोड नाही तुमच्या शौर्याला।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational