सावली .... !
सावली .... !
माझी सावली
किती मोठी किती छोटी
की पडतच नाही ....
याचा
मी कधीच विचार
करीत नाही ....
मी फक्त
एवढाच प्रयत्न करतो की ,
माझी सावली
फक्त ठळक पडली पाहिजे
आणि ,
फक्त नी फक्त
माझ्या कर्तृत्वाचं प्रतिबिंब
त्यात स्पष्ट नी स्वच्छ
दिसलं पाहिजे ....!!!!
