सावित्रीच्या लेकी....
सावित्रीच्या लेकी....
कळली ना कधी इथे
स्त्रीची उदारता कुणा..!
आजही सावित्रीच्या लेकींना
समाज लेखीतो उणा..!!
भरडली जाई ती
गोतावळ्यात घर प्रपंचाच्या..!
समाजाने कुत्सित नजरा
आवळाव्यात नराधमांच्या..!!
देशाच्या उन्नतीसाठी
तिचाही आहे हातभार..!
डावलूनी तिला पुरुषाचा
विरोध आहे धारदार..!!
ती सक्षम आहे भूवरी
सांभाळाया चोख जबाबदारी..!
द्यावीत सूत्रे तिच्या हाती
येईल नव्या नेतृत्वाला बहारी..!!
समजूया प्रथम कर्तव्य
स्त्री संरक्षण व सन्मानाचे..!
त्यांना देऊ या हक्कपीठ
अधिकार आणि स्वातंत्र्याचे..!!