सांजवेळ....!
सांजवेळ....!
शहरात गावात
सांजवेळ एकच असते
प्रत्येकाला घरी जाण्याची
घाई असते
कोण सूर्यास्त पाहून
घर गाठतो म्हणतो
कोण सूर्यास्तापूर्वी
घरात जाईन म्हणतो
नशीब प्रत्येकाचे
वेग वेगळे असते
कोणा कोणाच्या
नशिबात रविराजाचे दर्शन नसते
तरीपण हूर हूर
एक वेगळीच जाणवते
घरी जाण्याची ओढ मात्र
प्रत्येकाची एकच असते....!
