सांगा न् गडे
सांगा न् गडे
प्रिय रसिक बंधु-भगिनींनो...,मला ही विनोदी कविता सहज सुचली,ती एकदा नक्की वाचा.स्वत:ला शोधा.अन् सांगा,तुम्हाला कशी वाटली .
सांगा ना गडेऽऽ
आज नवरा म्हणे बायकोलाझाला का ग्ं स्वयंपाकनसेल झाला तर जाऊहॉटेलात जेवायला झाऽऽक !
खरंच गडे तुम्ही बोलला हेहे कसं सुचलं हो आज ?सांगा ना गडे मला कीदिलदारपणाचं राज !
साठी उलटली तरी कधीसोबत नेलं नाही फिरायलावेडबिड तर नाही ना लागलंह्या माझ्या कंजुस नव-याला
तो कानाजवळ जाऊन तिलाहळूच काही तरी बोललाऐकताच मात्र ती तरलागली चक्क नाचायला
खरंच का हो संसारातअसं वाढत्या वयात घडतं ?म्हातारे होता होता कोणीबायकोच्या प्रेमात पडतं ?
अगं,आजपर्यंत तू फक्त…घरातली कामं करित राहिलीरांधा वाढा अन् उष्टी काढास्वतः यातच अडकवत गेली
रोजच्या जगण्यात विसरलो प्रेमाच्या गुलूगुलू गप्पा आपणम्हणून डिनर घेतांना चघळूपहिल्या दिवसाची गोड आठवण
घरात पोरं आणि सुना आल्यासरली मग आपली प्रायव्हसीम्हणून घराबाहेर लुटू आपणआपल्या तरुण मनाची वीसी
पोरं आणि सुना आपल्याबघ,संसारात रमलेत छान !आत्ता आपणही करु मौजमज्जामैं तेरा राजा तू मेरी जान…!
© प्रा.पुरुषोत्तम पटेल, म्हसावद

