।।साई नाम।।
।।साई नाम।।
साई राम नाम तुझे मी सदा जपणार
कुणी नाही आज माझे तुझा मी होणार ।।धृ।।
दारी तुझ्या आलो देवा होऊनी भिकारी
दान तुझे घेता देवा जाईन माघारी
दान काय देणार देवा तुलाच मागणार
साई राम नाम तुझे मी सदा जपणार ।।१।।
आले किती गेले किती नाही कुणी रुसले
रामाचा तो हट्ट पाहुनी चंद्र नभी हसले
आरशात पाहणार नाही झोळी पसरणार
साई राम नाम तूझे मी सदा जपणार ।।२।।
दीन दुबळ्यांचा नियंता कृपावंत दाता
नाम तुझे घेता देवा मिळे सुख अनंता
धावत्या मागे पळणार नाही तुझाच मी राहणार
साई राम नाम तुझे मी सदा जपणार ।।३।।
।।सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय।।
