STORYMIRROR

Vikramsingh Chouhan

Inspirational

2  

Vikramsingh Chouhan

Inspirational

न्याय

न्याय

1 min
14.7K


खेळ हा सारा दैवाचा निराळा

दैव कुणाचा नाही कुणी जाणीला

डाव मांडीतो हा देव, डाव मोडीतो हा देव

सुख वाटीतो हा देव, दुःख सांडीतो हा देव

भाव हा सारा साईंचा निराळा

काळोखा च्या पोटी येई उजाळा

खेळ हा सारा दैवाचा निराळा।।धृ।।

स्वप्नं दावू नको, आशा लावू नको

डाव नियतीचा न्यारा, मना भुलवू नको

मार्ग दावू नको, निराशा टाळू नको

डाव दैवाचा न्यारा, दैव झुकवू नको

चुकत्या मनाचा घे रे तू ठाव निराळा

खेळ हा सारा दैवाचा निराळा।।१।।

दुर्भाग्याच्या हाती, तुझे हे सौभाग्य दे

आडत्या वाटेच्या कर्मा, तुझे सत्कर्म दे

असवांच्या ठायी, आनंद उजळुनी दे

राडक्या हृदयाच्या ठायी, परमानंद दे

जन्मो जन्मीचा न्याय हा सारा निराळा

खेळ हा सारा दैवाचा निराळा।।२।।

।।सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational