सेवा
सेवा
1 min
13.7K
दुःखा च्या सागरात लोटा साईनाथा
सुखात स्मरण तुमचे होत नाही आता।।धृ।।
क्षणोक्षणी अपमान माझे घडू दे
मानपान विसरुनी सेवा करू दे
कर्माच्या नादानं सत्कर्म घडू दे
पुण्य नसेल दैवी पाप मला लाभू दे।।१।।
गंगा यमुना नायनांच्या नयनात राहू दे
आनंदाच्या गंधला गगनात माळू दे
दुबळ्यांच्या मदतीला हात माझे लागू दे
तुझ्याच पावलांची वाट मला चालू दे।।२।।
जन्मो जन्माची ही पापं जन्मात सारू दे
सारणाच्या संगतीने सारेच जळू दे
जन्म मरण नको देवा शरण तुला येवू दे
चारणांच्या सेवे साठी अजन्म राहू दे।।३।।
।।सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय।।
