प्रकाश
प्रकाश
कुणी साई राम म्हणा, कुणी साई श्याम म्हणा
ह्रदयतुनी हाक ती द्या हो
मी शिर्डी सोडून येणार
कुणी साई राम म्हणा, कुणी साई श्याम म्हणा।।धृ।।
अंधाऱ्या रातीचा मी प्रकाश रे होणार
खाच खळग्याची ही वाट मी उचलुनी रे घेणार
ध्यानाचे ध्यान करा हो,मी साक्षात अवतरणार
कुणी साई राम म्हणा, कुणी साई श्याम म्हणा।।१।।
कर्तव्याच्या दारी मी सदैव रे असणार
आई वडिलांच्या चरणी मी सदैव रे रमणार
सेवेचे व्रत तुम्ही घ्या हो,मी वैकुंठी नेणार
कुणी साई राम म्हणा, कुणी साई श्याम म्हणा।।२।।
सूर छेडीता भक्तीचे मी संगत रे करणार
टाळ चिपळ्यांच्या संगती मी ढोलक वाजविणार
हाताने ताल धरा हो,मी नाचून दाखविणार
कुणी साई राम म्हणा, कुणी साई श्याम म्हणा।।३।।
।।सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय।।
