STORYMIRROR

Vikramsingh Chouhan

Others

2  

Vikramsingh Chouhan

Others

दिंडी

दिंडी

1 min
13.4K


साई नामाची दिंडी निघाली

पायी शिर्डीला पहा कशी चालली।।धृ।।

वैर जीवा शिवाचे न सरले,

दिल्या वचना का तू विसरले

सुख घेता दुख का आले,

दैव देवाचे का अडविले

तुझ्या चरणांची ओढ लागली

पायी शिर्डीला पहा कशी चालली।।१।।

नात्या गोत्यांचे नाही, जुळले स्वार्थ मना

मनी दाटीले अंतरीचे भाव

नकळता डोळ्यात असावं उरले

तुझ्या भेटीची आस वाढली

पायी शिर्डीला पहा कशी चालली।।२।।

दांभिकता मनी नाही रुजली, मुखवट्यांची आस न उरली 

तुझ्या वचनांशी जीव जडले,

पैलतीरांचे स्वप्नं पहिले

जन्मो जन्माची नाळ जुळली

पायी शिर्डीला पहा कशी चालली।।३।।

।।सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय।।


Rate this content
Log in