।।कोण कुणाचे नाही।।
।।कोण कुणाचे नाही।।
कोण कुणाचे नाही सांगताहे
शिकून घे सारे बोल संतांचे
कोण कुणाचे नाही सांगताहे ।।धृ।।
दुडदुडले नाते स्वार्थीया तालावरी नाचले
खोटेच हसले खोटेच रडले खोटेच भुलविले
कोण कुणाचे नाही सांगताहेे।।१।।
गडबडले सारे दुःखांती नाहीच कसे कुणी उरले
गरज होती गरज सारली गरज ना उरली
कोण कुणाचे नाही सांगताहे।।२।।
धडपडले सारे कळसा ह्या नाही कुणी गाठीले
अधुरी भक्ती अधुरी शक्ती अधुरी रे मुक्ती
कोण कुणाचे नाही सांगताहे।।३।।
फरपटले सारे तयांना जीवन नाही कळले
उपाशी होते उपाशी राहिले उपाशी ते गेले
कोण कुणाचे नाही सांगताहे।।४।।
रड रडले सारे देव हे नाही कुणी पहिले
आईच्या ह्रदयी पित्याच्या चरणी गुरूंच्या गुरुवाणी
कोण कुणाचे नाही सांगताहे।।५।।
।।सद्गुरू साईनाथ महाराज की जय।।
