।।काय सांगू तुला।।
।।काय सांगू तुला।।
काय सांगू तुला, कसं सांगू तुला
घोर लागलंय जीवाला, कसं दावू तुला
तू तर अंतर ज्ञानी, सर्वा सर्व ज्ञानी
तुझ्या नामाचा जयघोष, का थांबला।।धृ।।
कसं संसार करू, तुझी सेवा करू
तुझे ध्यान करू, माझे काम करू
कसं भक्ती च्या नावाने पोट भरू
काय सांगू तुला, कसं सांगू तुला
घोर लागलंय जीवाला,कसं दावू तुला।।१।।
कर्तव्याला तारू, तुझ्या मागे फिरू
तुझे गुणगान करू, जप माळ धरू
ध्यान लागेचना कसं मन आवरू
काय सांगू तुला, कसं सांगू तुला
घोर लागलंय जीवाला, कसं दावू तुला।।२।।
ह्रदयाचा तू राजा, ह्रदयात तू माझ्या
सोहमा चा बाजा, ह्रदयी वाजे माझ्या
घे नमस्कार माझा कळसाला तुझ्या
काय सांगू तुला, कसं सांगू तुला
घोर लागलंय जीवाला, कसं दावू तुला।।३।।
।।सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय।।
