।।प्रभात।।
।।प्रभात।।
1 min
15.5K
तुझ्या नामाची रे लागली का गोडी
साईनाथ सांग सांग सांग
तू तर ज्ञानी अंतरज्ञानी
सांग कुणाची ही करणी
उठता बसता खाता पीता गातो तुझीच गाणी।।धृ।।
निर्मळ वाचा निर्मळ वाणी निर्मळ झाले ध्यान
तुझ्या नामाचे गोडवे गाता पावन झाले कान
माळराणी या सूर छेडीत हिरवे झाले रान।।१।।
नाना तऱ्हेची लीलया दावूनी दिली सदा तू साथ
संकटकाळी रूप घेवूनी दिला हाती तू हात
काळोखाची रात सारूनी दावली तू प्रभात।।२।।
नाम घेवूनी ध्यान लावूनी सोडीले सारे पाश
नर देहाचे मोह सोडीता जुळले आपले पाश
या जन्माचे पांग फेडीता मिळले रे आकाश।।३।।
।।सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय।।
