STORYMIRROR

Vikramsingh Chouhan

Others

2  

Vikramsingh Chouhan

Others

।।हाक।।

।।हाक।।

1 min
3.0K


फाटक्या झोळी चा राजा कुणी पाहिला

अकरा वचनांची दिली हाक जगाला।।धृ।।

भिक्षा वाढ माई,दारी तुझ्या साई

मागायला येई,देवूनी जाई

भरल्या संसारी वैभव कुणी दाविला

अकरा वचनांची दिली हाक जगाला।।१।।

आंधळ्या पांगळ्यांनां, जेवू खावू घाली

रांजल्या गांजल्यांना, उराशी कावटाळी

भोळ्या भगतांचा वाली कुणी पहिला

अकरा वचनांची दिली हाक जगाला।।२। 

शिर्डीला आली, महामारी साथ

बाबांनी मारली, धन्वंतरी हाक

साऱ्या गावाचा गोळा कुणी पहिला

अकरा वचनांची दिली हाक जगाला।।३।।

पावलांची माती, लावूनिया माथी

बाबांची ख्याती,दारोदारी नांदती

उदि नामाची महती जनी दाविला

अकरा वचनांची दिली हाक जगाला।।४।।

।।सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय।।


Rate this content
Log in