STORYMIRROR

Vikramsingh Chouhan

Inspirational

2  

Vikramsingh Chouhan

Inspirational

आनंद

आनंद

1 min
2.8K


साई तुझे नाम घेता, मनाला क्षणांचा विसावा

क्षण हा क्षणांचा नसावा, औक्षण जीवाला घडावा।।धृ।।

गाऊ तुझे गोड गाणे, छेडुनि सुरांचे तराणे 

सूर छेडीता भक्तीचे, भाव मनाशी जुळवा

साई तुझे नाम घेता, मनाला क्षणांचा विसावा।।१।।

भक्तीचे मार्ग अनेक, सबका मलिक तूच एक

उजळुनी भाव मनाचे, अंतर मनाला जपावा

साई तुझे नाम घेता, मनाला क्षणांचा विसावा।।२।।

भक्तीला मुक्ती ची आस, मुक्तीला साईंचा ध्यास

सदैवाशी साक्षी असावा, अनुभूतीला अंत नसावा

साई तुझे नाम घेता, मनाला क्षणांचा विसावा।।३।।

।।सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational