रयतेचा राजा
रयतेचा राजा
रयतेचा राजा
शिव छत्रपती
खराच सन्मान
स्वराज्यास गती ...
जिजाबाई माता
संस्कार मोलाचे
दिले शिक्षणाने
क्षण आनंदाचे ...
ढाल तलवार
तरबेज झाले
गनिमी काव्यात
खेळात जिंकले ...
होते सवंगडी
सारेच मावळे
होते पारंगत
युध्दात सगळे
किती गडकिल्ले
लीलया जिंकले
स्वराज्य स्थापिले
शत्रू ते हरले ...
असा महाराज
शिवाजी सारखा
राजा होणे नाही
देशही पारखा ...
पुन्हा जन्म घ्यावा
विनंती करते
देवाला प्रार्थना
नवस बोलते ...