STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

रविवार सुप्रभात...!

रविवार सुप्रभात...!

1 min
1.4K


सुप्रभात...!

धुक्याला आणि

थंडीच्या गारव्याला

तो सुद्धा घाबरला

बाहेर पडता पडता पुन्हा

ढगांची चादर घेऊन नजरे आड झाला...!


म्हंटल

अरे, हे दिवस, ही वेळ

पुन्हा पुन्हा येत नाही

जरा याचाही, एकदा अनुभव घे

तुझ्या स्वागतासाठी थांबलेल्यांना

थोडं समजून घे

तसा, तो आळस झटकून बाहेर आला


आणि हसत मुखाने

सुप्रभात म्हणाला

खर सांगू

खूप खूप बर वाटलं

डोळ्यांचं पारणं फिटलं

आनंदान जीवन नटलं

जीवनाच कोड सुटलं

सोनेरी झालर घेऊन येण्यासाठी

जेंव्हा तांबडं बेफाम फुटलं....!

सुप्रभात...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational