STORYMIRROR

Meena Kilawat

Inspirational

2  

Meena Kilawat

Inspirational

ऋतू येती

ऋतू येती

1 min
13.4K


या कालचक्राच्या भोवती

पृथ्वीवासी नित्य फिरती

होई दिवस आन् रात्र अशी

युगामागुनी युगे अवतरती

ऋतूं येती ऋतूं जाती कधी

ऋतूं सुकवती कधी बहरवती

नियमित अपुले कार्य करूनी 

या जगात सुखदुख फुलवती

उन्हाळा हा वणव्यात रडवतो

पावसाळा हा पावसात भिजवतो

हिवाळा हा थंडीत सुखावतो 

सदा ऋतू आपली कामे करतो

वसंत ऋतू शरद ऋतूचा महिमां

हेमंत ऋतू,शिशिर ऋतू,ग्रीष्म ऋतू

सकलांचा ऋतूशी प्रेम जिव्हाळा

ब्रम्हांडातील दिव्य कर्तबगार ऋतू.

वर्षभऱ्यात येती हर्ष घेवूनी 

कधी जणू उदास करीती

खेळत,रांगत नाचत येती

जसे बाळ उत्कर्षात न्हाती.

ऋतू निसर्गाला देती साथ

रम्य ऋतूंचा सोहळा गाजे

कधी मौन पांघरती वादळे

मनमोहक सृष्टीचा रंग सजे.

  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational