STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

रोज डे...!

रोज डे...!

1 min
799


आज 7 फेब्रुवारी 2019,नवीन पिढीचा रोज डे,बर वाटल मूल नवीन पद्धतीनं आनंद लुटतात, आपल्याच विश्वात रमतात!थोडं आम्ही पण शिकायला,आत्मसात करायला आणि त्यांच्याशी जुळवून घ्यायला काय हरकत आहे?लहानात लहान ,मोठ्यात मोठं झालं की जीवन सुखकर होत बर वाटत,अहंकार, मी पणाला तिलांजली दिली की जीवन बहरत याचा अनुभव येतो,पिढीतील अंतर विरून जात आणि एक विश्वासाचा ऋणानुबंध दृढ होतो!😊नात टिकवण्यासाठी ,रुजवण्यासाठी आणि वृद्धिंगत होण्यासाठी या अतूट विश्वासाची मदतच होते.हसत खेळत जीवन जगण सोपं जातं आणि जीवन कृथार्थ होत,!


आज गुलाबाचं फुल देताना

मला खुप सुख लाभतय

तुझ्या चेहऱ्यावर हसू खुलताना

मला खुप छान वाटतयं....!


अग आजवर काटेच नशिबी आले

म्हणून काट्याची बोचणी मी जाणतोय

म्हणून तुला हा गुलाब आज

देठाचे काटे सारे काढूनच देतोयं....!


तुझ्या जीवनात आनंदा शिवाय

दुसरे काही असू नये असं मला वाटतंय

म्हणून तुला आनंदी ठेवण्यासाठी

सदैव काळीज माझं फाटतयं...!


तुझ्या कष्टाचे मोल मी जाणतोयं

म्हणून थोडया प्रेमाने उतरायी होऊ पाहतोयं

तुझ्या साथीनेच संसार माझा खुलतोयं

म्हणून गुलाब देऊन गाली हसू पाहतोयं....!


जोडीची संसार वेल आपली

अशीच बहरून सदा राहू दे

संसार तुझा नी माझा प्रिये

सदैव आनंदात अखंड न्हाऊ दे....!


परमेश्वराची कृपा ही सारी

अपत्ये गुणी दोन आपणास लाभली

आज गुलाब देताना त्यांची

अंतरात ग जाण सुखद जागली....!


रोजच रोज डे जीवनात येऊ दे

तुला रोज रोज देऊ दे

तुझ्या गाली असेच सदा हसू खुलू दे

सांसार आपला असाच हसरा राहू दे....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational