STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

रंगभरी दुनिया

रंगभरी दुनिया

1 min
177

सप्तरंगी इंद्रधनू

नीलमणी आकाशात

शुभ्र चांदण्यांची खडी

रजनीच्या पदरात


नटे वसुधा लेऊनी

गार हिरवे गालिचे

फुले विविध रंगांची

साज रंगसंगतीचे


रत्नाकर मीलनात

श्वेत नीलम हिरवा

असे संगम तरीही

रंग दिसतो बरवा


रंग येती जीवनात

स्नेह प्रेमाचे हर्षाचे

उजळूनी दशदिशा

तेजोमय किरणांचे


उल्हासाचे उत्साहाचे

उत्सवाचे आनंदाचे

रंग भरती जीवनी

सुख परमानंदाचे


भाव भावनांचे रंगे

गंध भरे जीवनात

न्हाऊ वेगळ्या रंगात

आगळ्याच आनंदात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract