रंग
रंग
रंगांना नसते जात, धर्म
रंग दर्शविती कर्मं।।
रंगांना नसावे कसले बंधन
रंगाने होईल जीवन सुंदर नंदनवन।।
सात रंगांनी सजवितो अंबरा
तो इंद्रधनू भासे स्वर्गाचे व्दार जणू।।
मानवतेचा रंग पसरावा चोहीकडे
आनंदाचा रंग फैलावा सारीकडे ।।
रंगांचा भेद न करावा भक्ती, प्रेमाचा,
आपुलकीचा रंग मनी असू द्यावा।।
चला सारे मिळून रंग एकतेचा उधळू या
एकमेकांच्या रंगात रंगुनी जाऊ या।।
