रंग भरतोय पानी
रंग भरतोय पानी
रंग भरतोय पानी
नभी दाखवूनि रंग
सप्तरंगी इंद्रधनू
शिवलीला खेळवूनी
सृष्टीमधी भरतोया
रंग रंगाची रांगोळी
बरसुनी श्रावणात
सजवूनी शिववारं
रंग सात अर्थसार
सुख दुःखाचे दावते
हर्ष आनंदात सर्व
उधळून चाले रंग
नवनवी हिरवळ
बोले स्वर्ग हेचि आता
फुल फुलात सांगते
बहरली मोहरून
ओमकार गीत गात
मधुमय शिवार करती
कण कणात नाचत
बोले हर हर शुभं
