STORYMIRROR

Deore Vaishali

Inspirational Children

3  

Deore Vaishali

Inspirational Children

रम्य ते बालपण

रम्य ते बालपण

1 min
241

नखांवर नखें घासत, बगळ्याकडे कवड्या मांगायचो,

विमानाचा आवाज आला की,धावत त्याला बघायचों,

उडणार्या त्या म्हातारीशी,

मनमोकळेपणाने खेळायचो.... किती छान होते ना ते बालपण.

न बोलवताही मित्रमैत्रिणींकडे जायचो,

परतांना वेळ नाही आईचा आवाज असायचा,

खेळायला खेळण्या नाही, फक्त मिञमैञीणी असायचे,

दुपारी न झोपता चल्लस,चिप चिप खेळायचो,... किती छान होते ना ते बालपण.

कोणीतरी गुपचुप येऊन हळुच डोळे झाकायचं,

नुसत्या स्पर्शानेही आपण त्याला ओळखायचं,

आंबट चिंबट खाल्ल तरी आई नाही रागवायची,

अंगात ताप ,सर्दी असली तरी पोर गावभर फिरायची ... किती छान होते ते बालपण.

आता ना राहिले ते नाविन्य,आला सगळीकडे समंजसपणा,

विमानात बसुनही कौतुक असे वाटत नाही,

Online असतात गेम ,मिञमैञिणींची गरज पडत नाही,

स्पर्शाने ओळखणारे मन,समोर दिसले तरी ओळखत नाही,

आभासी झाले जग...बालपण त्यात हरवलं...

ना उरली ती मज्जा मस्ती... ऑनलाइन मध्येच जग रमू लागलं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational