रमेश भाटकर..श्रद्धांजली...!
रमेश भाटकर..श्रद्धांजली...!
अभिनेता रमेश भाटकर यांचे चरणी
काव्यसुमनांची भावपूर्ण श्रद्धांजली....!
अनभिज्ञ पणे अवतरता
भीती मराठीची कलेची पळाली
नेटक्या अभिनयाची नांदी होता
कलेच्या ताटव्यांनी ती लीलया खुलून आली
र स्ते अनेक होते
मे जवान्या अनेक होत्या
श रम वाटता वाटता
भा ग्याच्या शोधात जाताना
ट वाळकी अनुभवास आली
क सलेला कलाकार मी
र त्ती भरही मागे हटलो नाही
पुढे पुढे पाऊल टाकत टाकत
चालत राहिलो
नवे नवे सबंद जोडत राहिलो
आणि जाताना
अपुरी स्वप्न तुम्हाला
हसत मुखाने देऊन जातोय
कला जपा,शिका,वाढवा
आणि वृद्धिंगत करा....!
रमेश भाटकर यांच्या चरणी
काव्यसुमनांची अदारांजली...!
