रहस्य
रहस्य
वारा करी
सांय सांय
सरपट
धावे काय
अवसेच्या
काळोखात
पुढे येई
एक हात
विधी सारी
मांडलेली
चेटकीने
हाळी दिली
कवटी ती
चित्कारली
सैतानास
जाग आली
सापळ्यांचा
सुरू नाच
मंत्रोच्चार
ऐकताच
कर्मकांड
जीव घेणे
रहस्य हे
कोण जाणे!
