प्रेमाची आस
प्रेमाची आस
आज अचानक मला तीच आकृती
तीच चाल तीच लकब तीचीच वाटली
म्हणून मी माझी बैठक तेथेच थाटली
वाटले ती तीच असली तर भेटेल परत
त्याच चालीने त्याचवाटेने येईल वाटली
म्हणून मी माझी बैठक तेथेच थाटली ।
वाटले ती तीच असेल भेटेल येता परत
त्याच आशेने त्याचवाटेते भेटेल वाटली
म्हणून मी माझी आस वाटेत थाटली ।
वाटले ती तीच होती येत प्रेमिका परत
त्याच प्रेमाने त्याचओढीने मला भेटली
म्हणून मला माझ्या प्रेमाचं प्रेम भेटल !
****************
श्री. काकळीज विलास यादवराव ( नांदगाव )
