STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Thriller

3  

Manisha Wandhare

Abstract Thriller

दुःखाचे सावट...

दुःखाचे सावट...

1 min
2

चहूबाजुनी गुरफटलेली ,

चेहऱ्यांवर चहरे चढलेली ,

तरी का? भटकलेली,

पाठमोरी भयाण सावली...


सुखाची कळशी भरली,

झळकू दे होऊ दे,

चालता चालता माती ओली,

ही रात्र काळी कोरडलेली...


दुःखाचे सावट पाहूनी,

एवढ्यात तु घाबरली,

आयुष्य म्हणजे युद्ध,

इथे कोण नाही लढली...


एकटी नाही मृगजळात ,

तुला असंख्य वार दिसली,

वळून बघ पाऊलखुणा,

ज्यात किती तरी होरपळली...


सुखाच्या हौसेने दुःख दिली,

तुझ्या मनाला ना कळली,

सोडून दे ही अपेक्षा,

बघ समाधानाने ओंजळ भरली...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract