यश सारं मिळतं
यश सारं मिळतं
अवघड वाटणारं, सगळंच सोपं असतं
प्रयत्नांच्या ओढीवर, यश सारं मिळतं
रडतो आम्ही कित्येक वेळा, काय ते मनी साचलं
संपणाऱ्या प्रत्येक स्वप्नांच्या, सरण ते रचलं
कित्येक विरोधाच्या, ओव्या मी वाचतं
प्रयत्नांच्या ओढीवर, यश सारं मिळतं
आपल्याच विश्वासाने, थोडं तरी गळतं
ज्याची चुकी झाली, त्याला मग कळतं
वेळेच्या ओघाने, पाणी ही ते वळतं
प्रयत्नांच्या ओढीवर, यश सारं मिळतं
थोडं थांबलो की, सत्यही थोडं पळतं
उजेडात सर्थाच्या, सारं काही दिसतं
हा कधी पैश्यासाठी, काही तरी पुसतं
प्रयत्नांच्या ओढीवर, यश सारं मिळतं
काय सांगू कोण्हा, नियती असते पाळतं
काय तो संबंध वेळचा, असा गजरा माळतं
काय आन कोण ते, साऱ्यां त्यांना मी टाळतं
प्रयत्नांच्या ओढीवर, यश सारं मिळतं