तू नसताना
तू नसताना
तू नसताना वाटतो
एकटेपणा अखंड
एकांतात जात रमुन
मी देत राहते तोंड
वाटेकडे लावून डोळे
थांबते मी थबकुन
चाहूल ती कसलीशी
पाहते मी वाकून
वावर तुझा आवडतो
क्षण साठवते मी भेटीत
तुझा भास होतो सदा
हरखुन जाते आठवणीत
तुझी वाट पाहताना
वेळ वाटतो संपावा
तुला भेटण्या आतुर
जीव कसा फुलावा
