धबधब्याची सहल
धबधब्याची सहल
"दिल है छोटासा छोटीसी आशा मस्तीभर मन मे भोलिसी आशा"
माझे अतिशय आवडते गाणे 'रोझा' चित्रपटातले
गाण्याच्या बोलसोबतच आकर्षण तिथल्या जागेचे
पाण्याचा धबधबा तिथला बघण्याचे वेड होते
आणी म्हणूनच या सहलीचे आयोजन केले होते
'होगेनाक्कल' हे त्या पर्यटन स्थळाचे नाव आहे
कावेरी नदीच्या पाण्याचे धबधबे येथे प्रसिद्ध आहे
तामिळनाडू राज्यातले धबधब्यांचे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ मानले जाते
याला कधी कधी " भारताचा नायगारा धबधबा" म्हणून संबोधले जाते
काही ठिकाणी पाणी 20 मीटर (66 फूट) इतके खाली येते
येथे सतत मेघगर्जनासारखे आवाज येत असल्याचे म्हटले जाते
छोट्या छोट्या खडकावरुन जलद गतीने पडणारे धबधबे अवर्णनीय आहे
पांढ-या शुभ्र पाण्याचे काळ्या खडकावरुन पडणारे दृश्य बघण्यासारखे आहे
बांबूपासुन बनवलेल्या बास्केट आकाराच्या बोटीतून फिरण्याचा आंनद भारी आहे
शांतपणे निसर्गाची किमया बघत नदीतून फिरण्याची मौज काही और आहे
या पाण्यात खेळण्याचा मोह काही केल्या आवरता येत नाही
वातावरणातील जादू कशी भुलन पाडते हे शब्दात सांगाता येत नाही
अनेक त्वचारोग पासुन या धबधब्याचे पाणी रक्षण करते
लक्षवेधी दृश्यांनी भरलेले हे पर्यटन स्थळ तणावमुक्त करते
