यशाचा शिखर
यशाचा शिखर
ठरवले मनाशी की निभवता आले पाहिजे
योजना आखून झाल्या की सोडवता आल्या पाहिजे
चिंता नसतेच करायची मेहनतीच्या त्या प्रखर
मगच गाठता येतो यशाचा शिखर
मऊ व थंडपणा सोडायचा असतो
आळशीपणाला कायमचा पूर्णविराम द्यायचा असतो
पर्यायाने बिनफुकटच मिळत नसतो सोन्याचा मखर
मगच गाठता येतो यशाचा शिखर
हौस व छंदाला बाजूला ठेवायचे असते
लक्ष फक्त आणि फक्त ध्येयपूर्ती कडे असते
कधी कधी इच्छेत बनावे लागते कणखर
मगच गाठता येतो यशाचा शिखर
उद्याचे काम आजच आटपावे लागते
वेळेच्या किमतीचे नेहमी भान ठेवावे लागते
कठीण परिश्रमाच्या नंतरच मिळते निकालाची गोड साखर
मगच गाठता येतो यशाचा शिखर
