STORYMIRROR

Meera Mahendrakar

Classics

3  

Meera Mahendrakar

Classics

रंगांची होळी

रंगांची होळी

1 min
11

 रंगांची उधळण घेऊन आला

 प्रत्येक मनी तो हर्ष मावेना


 रुसवे फुगवे जाळून होळीत

गोडवा जपूया पुरण पोळीत 


आनंद उत्साह व नुसताच गोंधळ

 नात्यात वाढ करणारी प्रेमाची ओंजळ


 रंगांच्या मैफिलीत मैत्रीला उधान येतो

 नव्या नवलाईचा प्रेमाचा रंग आणखी गडद होतो 


रंगेबिरंगी चेहऱ्यावरचा उत्साह भारी 

मनोरंजनासोबत हर्षल्लासाची ती तयारी 


लहान थोरांची ती सारखीच असते

 होळी प्रत्येकात आपलेपण जपते 


काही क्षण का होईना ताण विसरायला लावते

 होळीचा सण आनंदाची उधळण करून जाते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics