विश्व गुलाब दिन..!
विश्व गुलाब दिन..!
आ ज विश्व गुलाब दिन
ज रा पीडितांचा विचार करू
वि श्वभरातील पीडितांच्या
श्व सनात चला जरा आनंद भरू...!
गु दगुल्या आठवणींच्या काढू
ला ड त्यांचे आज पुरवू
ब रे होतील आपोआप
दि न सोन्याचे चला त्यांना दाखवू...!
न कळत आपण सारे
प्रेमाने त्यांचा हात धरू
जीवन आंनदी जगण्यासाठी
चला थोडा प्रयत्न करू....!
कर्क रोगी असले तरी
त्यातूनही ते बाहेर पडतील
उद्याचे आनंदी दिवस बाबांनो
आपल्या प्रेमाने पुन्हा पाहतील...!
आशेच्या पंखात त्यांच्या
आज आपण बळ भरू
सौख्य समाधान शांतीसाठी
त्यांच्यावर मायेची छाया धरू....!
