STORYMIRROR

Raakesh More

Romance Tragedy Classics

3  

Raakesh More

Romance Tragedy Classics

अशी वेळ येणार नाही

अशी वेळ येणार नाही

1 min
181

कधी तुझी गरज पडेल 

अशी वेळ येणार नाही 

आणि वेळ आलीच तर 

हृदय हरू देणार नाही || 0 ||


वाटतं तूला तुझ्याशिवाय 

मला जगणं जमणार नाही 

तुझ्याशिवाय हृदयाची 

तहान माझी शमणार नाही 

जीवनात मी कधीही 

तुझी मदत घेणार नाही 

आणि वेळ आलीच तर 

हृदय हरू देणार नाही || 1 ||


तुझ्या आसपास ही

मला आता यायचं नाही 

तुझ्या आठवणींना ही 

मिठीत मला घ्यायचं नाही 

तुझ्या आसपास ही 

मन कधी नेणार नाही 

आणि वेळ आलीच तर 

हृदय हरू देणार नाही || 2 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance