STORYMIRROR

Meera Mahendrakar

Classics

4  

Meera Mahendrakar

Classics

प्रवास स्त्रीत्वाचा

प्रवास स्त्रीत्वाचा

1 min
4

 जन्म होताच मुलीचा आनंद होतो पित्याला 

बहीण बनवून भावाची सुरुवात होते नात्याला


 बालपणीच्या सुरुवातीतच खेळभांडे व बाहूलीचा खेळ

 नकळत्या वयात खेळा सोबत जबाबदारीचा तो मेळ


शिक्षणाची सुरुवात होते मुलीची घराजवळच्या शाळेकडून 

सुरक्षेच्या बंधनात काहीश्या अपेक्षा स्वतःकडून


शालेय जीवनात मैत्रीची होते खरी सुरुवात 

नात्यांच्या वाढीत मिळतो मैत्रिणींचा घट्ट साथ 


कॉलेज सुरू होताच तारुण्यात पदार्पण होते 

चांगल्या वर्तनाची आकर्षणासमोर जीत होते


खऱ्या सहजीवनाचा संसाराला लग्नातून शुभारंभ  

नात्यांमध्ये सून व बायकोच्या जबाबदारीचा तो आरंभ 


तोल सांभाळत असताना मिळतं मग आईपण

 खऱ्या कसरतीत कसोटीला लागतं मग तिचं बाई पण


 अस्तित्व आपलं पणाला लावून भूमिका वटवत असते 

आयुष्य सरत असलं तरी आपली कर्तव्य सर्वप्रथम जपते


मुलं मोठी झाली की थोडी निवांत होऊन विसावते 

थोड्याच काळाने मग नात्यात सासूला सुरुवात होते


भूमिका सासूची मोठी तेवढी महत्त्वाची 

वेळ परीक्षा घेतो नेहमी तिच्या सत्वाची 


आजी बनवून नातवांसाठी नातवांची खेळ करी बनते
 आरामाला विराम देऊन पुन्हा संसारातच रमून जाते


बहिण, सून, बायको, आई, सासू, आजी या नात्यातच तिचा जीव गुंततो

 एका स्त्रीचा न संपणारा हा प्रवास आयुष्यभर सुरूच असतो


सगळ्या नात्यांमध्ये तिच्यातली मुलगी कुठेतरी हरवते 

शेवटी महिला म्हणूनच का होईना समाज तिचा सन्मान करते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics