नाराजी
नाराजी
प्रत्येक वेळी अपेक्षेचे ओझे घेऊन मन झुरत असतं
पूर्ण होईल या आशेने वाट बघत असतं
आपणच ठरवून ओढलेले हे आपल्यासाठी एक ताण आहेजणू परीक्षेचे आपण होऊन घेतलेले हे नवीन वाण आहे
अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की येतो मग नाराजीचा सूर
मनाला वाटतं भीती त्यात छळतो नैराश्याचा असुर
कशात रमत नाही मन मग आपलं
वाटतं आता इथंच सगळं संपलं
खरंच गरजेची असते का ही नाराजी इतकी ?
तब्येतीला झेपतात का हे विचार घातकी ?
त्यापेक्षा नेहमी सकारात्मकतेचा ध्यास असावा
नाराजीचा सूर काढुन नवा संकल्पनेचा आढावा घ्यावा
करून बघितले की सगळे कसे आपोआप जमत जाते कशाला किती महत्त्व द्यायचे याची मनालाही विधान पटते
