STORYMIRROR

Meera Mahendrakar

Abstract Fantasy Thriller

3  

Meera Mahendrakar

Abstract Fantasy Thriller

तामिळनाडू

तामिळनाडू

2 mins
4

तामिळनाडू एक राज्य आपल्या भारतातल एवढेच ज्ञान होते

सहलीनिमित्याने जे जवळुन बघितले ते विसरण्यासारखे नव्हते 


"येरकाॅड" हे तामिळनाडू मधलं एक हिल स्टेशन आहे

निसर्ग सुंदरता तिथली मोहक व वर्णनात्मक आहे


बॅगलौर ला फ्लाइट नी पहाटेच पोहोचली 

लगेच बस पकडून सेलम शहराकडे निघाली 


सेलमला तयार होऊन येरकाॅड साठी पुन्हा बस पकडली

'सरोवराच जंगल' या नावाने ओळखल्या जाणा -या सहलीची सुरवात झाली 


तामिळनाडुची सरकारी बस आतुन खुप आकर्षक होती

रंगेबीरंगी लाईटस् व कलर नी मस्त सजवली होती


तमिळ भाषेची बसमधे गाणी लावली होती

जंगलाच्या प्रवासाला त्याची साथ लाभली होती


येरकाॅड ह्या हिल स्टेशनकडे जाणारा रस्ता जंगलाचा भयंकर होता

एक दोन नाही तर तब्बल वीस U- पिन वळणाचा घाटाचा होता


रस्त्यात इतकी घनदाट जंगल होती कि लोकवस्तीची कल्पना करवत नाही

प्रत्येक दहा किमी नंतर छोटे जंगलातले गाव डोळ्यांनी पाहूनही विश्वास बसत नाही


इतक्या दुर्गम भागात कशी राहतात ही लोक याचा मला अंदाज येत नव्हता 

कदाचीत शहरात राहुन दाटीची सवय झालेल्या मनाला हा विचार पटत नव्हता


येरकाॅड समुद्रासपाटीपासुन ५३२६ मीटर उंचावर आहे

इथले मुख्य आकर्षण सरोवरे व फुलबागा आहे


वातावरणातला थंडावा पुर्ण ताजेतवाने करतो

पहाडातली निसर्गरम्यता डोळ्यांचे पारणे फेडतो


जंगल, पहाड, दुर्गम वस्ती ती तिथली आकलनाबाहेर आहे

तमिलनाडु राज्याचे बहुदा हेच वैशिष्ट आहे


या सहलीमुळे तामिळनाडू राज्याचे आकर्षण वाढले

दक्षिणेकडील राज्यातील निसर्गाच्या नव्याने प्रेमात पडले 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract