माय
माय
1 min
15
जिच्या अस्तित्वाचे महत्व असते घरी
ती मायच असते खरी
मृदू वचनाची जणू एकमेव प्रेमळ परी
ती मायच असते खरी
जाणीवपूर्वक जी प्रत्येकाची चिंता करी
ती मायच असते खरी
कोमल हृदयात तिच्या आठवणींची दरी
ती मायच असते खरी
न सांगता सगळं समजून घेतांना सहाय्यक ठरी
ती मायच असते खरी
वासल्य मूर्ती कठोर वचनाची असली जरी
ती मायच असते खरी
समंजस व सालस वृत्तीची एकमेव मानकरी
ती मायच असते खरी
जीवन जगण्याची कला शिकवते ती बरी
ती मायच असते खरी
