देश माझा
देश माझा
तो भारत देश आहे माझा
जिथे शेतकरी सोन्यासारखे पीक घेतो देशासाठी
कायम विचार करतो स्वतःच्या पहिले इतरांसाठी
तो भारत देश आहे माझा
जिथे बहुराष्ट्र मिळून प्रेमाने एकत्र राहतात
जात पात सोडून एकमेकांना समजून घेतात
तो भारत देश आहे माझा
जिथे अतिथी देवो नेहमी जपला जातो
दिसण्यावरून कधीच भेदभाव नसतो
तो भारत देश आहे माझा
जिथे वाळवंटासारखा उष्णकटिबंध परिसर आहे
तर बर्फाच्छादित होणारा पहाडांचा नजारा पण आहे
तो भारत देश आहे माझा
इथे हिमालयाच्या उंच पर्वतरांगा आहे आणि
समुद्राचे मोहक त्रिवेणी संगम ही आहे
तो भारत देश आहे माझा
जिथे स्वातंत्र्यसेनांची थोर इतिहास आहे तर
राजे महाराजांच्या वाड्यांचे भव्य प्रसादही आहे
तो भारत देश आहे माझा
इथे संस्कृतीची उत्तम जाण आहे
सुंदरता व सुबत्तेची देशभर खाण आहे
तो भारत देश आहे माझा
जो गरजेच्या वेळी इतर देशांना मदत करून मित्रता जपतो मोबदला न घेता मन मना सकारात्मकता वाढवतो
