शोध
शोध
1 min
2
शोधले रे ईश्वरा तुला देऊळ व मंदिर गाभाऱ्यात
पण तू तर होता दीन दुबळ्यांच्या पुढ्यात
रमले होते मी तुझ्या भजनात व नामस्मरणात
तू तर काम करत होता गरजूंच्या सहकार्यात
आशीर्वाद शोधत होते तुझ्या नावाच्या अंगाऱ्यात तू तर दिला होता तो गरीबाला समाधानात
घंटानाद करत होते तुला जागे करण्यात तू तर जागा आहे वृक्षवेली आणि निष्पाप पशुपक्ष्यात
नैवेद्य दाखवत होते तुला प्रसन्न करून घेण्यात तू तर प्रसन्न आहे त्या मुक्या अबोल जनावरात
खूप शोधले रे परमेश्वरा तुला आपल्याच स्वार्थात तू तर इथेच आहे प्रत्येक शुद्ध अंतःकरणात
