पाऊस माझा
पाऊस माझा
अचानक हळुवार थंड हवेची झुळूक आली
कानात सुखद आठवणींची गोष्ट सांगून गेली
वातावरण बदल झाल्याची जाणीव झाली
पाऊस येणार असल्याचे सगळीकडे वार्ता पसरली
खूप वेळ वाट पाहणारा चातक हसला
हळुवार उगवलेला मग मोगराही फुलला
लक्ख प्रकाश देणारा सूर्य ढगांनी लपला
मेघगर्जनाच्या आवाजाने परिसर गरजला
क्षणभर गोंधळलेला गुलाब सावरला
कोकळी गीतेच्या हाकेने जीव भरावला
थेंब थेंब करत मग पाऊस सुरू झाला
मंद सुगंध मातीचा सर्वत्र दरवळला
खुलत गवताची पाती हिरवी झाली
निसर्ग राणी पाण्यात संपूर्ण न्याली
पानाफुलांची सुंदर मैफिल सजली
डोंगरदऱ्यात झऱ्याची पातळी वाढली
चिंब रस्ता पावसाने धुऊन निघाला
चहूकडे चैतन्याचा वर्षाव झाला
आसमंत हा नव्यानवरी सारखा बहरला
गर्द हिरव्या झाडीने तो पूर्णपणे नटला
वर्षा ऋतु ची सुरुवात करत येणारा
मनमनात आनंदी गीत गाणारा
प्रत्येकाच्या गरजा अचूक पूर्ण करणारा
असाच माझा पाऊस गं हा नातं निभावणारा
