सोडून द्या ना
सोडून द्या ना
अमुक व्यक्ती मला मुद्दामच टाळते
माझ्यासमोर अशीच नेहमी वागते
खरेच जाणीवपूर्वक समजून सांगाना आपल्या मनाला
अहो कधीतरी शिकान सोडून द्यायला
विसरला आहे तो निमंत्रण द्यायला
जाणूनच टाळतोय मला स्वतंत्रपणे सांगायला
तरी पण साथ देऊन बघा तुम्ही त्याच्या अमूल्य वेळेला
अहो कधीतरी शिकान सोडून द्यायला
त्याने अपमान केला म्हणून वाटच बघतो संधी शोधायला
उगाच महत्व देता या उर्मट वागण्याला
जपून बघा ना या सुंदर माणुसकी नात्याला
अहो कधीतरी शिकान सोडून द्यायला
बरीच किंमत असते सदाचारी वर्तनाला
अर्थ देऊन बघा या सार्थक जगण्याला
उगाच वाया घालू नका मौल्यवान आयुष्याला
आणि म्हणूनच शिकान सोडून द्यायला
