आरतीला येऊ का
आरतीला येऊ का
गणपतीच्या निमित्ताने
आरतीला येऊ का
ओळख करुन घरच्यांशी
प्रसाद बाप्पाचा घेऊ का || 0 ||
आगमनाने बाप्पाच्या
सर्वजण खूष असतात
शंकाकुशंका अशा वेळी
बिलकुल मनात नसतात
अशात तुझ्या आईवडिलांना
हिंट आपली देऊ का
ओळख करुन घरच्यांशी
प्रसाद बाप्पाचा घेऊ का || 1 ||

